TSK

TSK · योहा 14:26

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.

आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.

¶ “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.

तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.

‹म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.›

‹ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.›

देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.

¶ त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”

‹पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”›

‹संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.›

या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.

‹पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.›

‹पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्‍या गोष्टी तुम्हास कळवील.›

त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या.

‹परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”›

म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.

¶ अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.

तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, ‹“योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”›

¶ पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.

कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले:

तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.

पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.”

कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.

किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?

शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;

ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.

आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.

म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.

तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले.

¶ म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,

¶ पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,

कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.

पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.

पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,