¶ परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
TSK
TSK · योहा 16:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.”
तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
सियोनच्या कन्ये, प्रसवतीप्रमाणे वेदना पावून प्रसुत हो, कारण आता तू शहरातून बाहेर जाशील, शेतात राहशील, आणि बाबेलला जाशील. तेथे तुझी सुटका होईल, आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडवील.
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.”
ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.