अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.
TSK
TSK · योहा 4:20
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले.
मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांस मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.”
¶ मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”
नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.