पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.”
TSK
TSK · योहा 9:34
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.
मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.
जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे. या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते.
‹जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.›
¶ एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
‹“दोन जण प्रार्थना करण्यास वर परमेश्वराच्या भवनात गेले. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार होता.›
‹पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही.›
‹तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.”› ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”
त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?”
पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’
आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.
¶ मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.