TSK

TSK · लेवी 14:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

कुटून काढलेल्या पाव हिन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे.

¶ जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.

¶ खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.

¶ त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.

¶ मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे;

¶ परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा मैदा आणि एक लोगभर तेल आणावे;

¶ स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.

¶ जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.

मग येशूने त्यास म्हटले, ‹“पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”›

मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, ‹“कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”›

‹कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”›

निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.