TSK

TSK · मार्क 3:27

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.

ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल, कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.

‹किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.›

‹जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.›

आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले.

जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.

¶ आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.