TSK

TSK · मत्त. 9:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.

मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?

तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;

¶ तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.

‹आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत.›

‹सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.›

¶ ‹याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’›

‹तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?›

‹परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.›

तेव्हा येशू त्यास म्हणाला, ‹“नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?”›

‹कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”›

येशूने त्यांना म्हटले, ‹“तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?›

तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;

जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”

पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.

किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?

अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तीपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,

जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.