त्या खोऱ्याची उतरण आर शहराकडे वळते, आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यंत खाली जाते.
TSK
TSK · गण 21:28
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’
म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
जे पळून गेले होते ते हेशबोनाच्या छायेखाली निर्बल असे उभे राहिले, कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघाली आहे. ती मवाबाचे कपाळ आणि गर्विष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील.
म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.
म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”
म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.