TSK

TSK · गण 23:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे.

¶ त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात राहत होता. इथेच बलामचे लोक राहत असत. बालाकाचा निरोप हा होता. एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशातून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ दिला आहे.

तो निरोप हा, एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशामधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.

बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,

¶ बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.

¶ नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”

आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”

तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”

त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.

¶ नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला,

संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?

जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही.

मग मी त्यांना म्हणेन, आहा, हे परमेश्वर देव मला म्हणाला, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?

सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?

यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन.