TSK

TSK · गण 32:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.

त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.

¶ मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.

¶ “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.

परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.

आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा.

¶ मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.

आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.

आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.