TSK

TSK · फिलि 2:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्यास सर्व देशावर नेमले.

‹कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.›

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‹“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.›

पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’

देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.

¶ आता, जेव्हा वचन असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही?

तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात

समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले; आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला.