TSK

TSK · नीति 29:12

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”

जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?

बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.

येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.

आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.

उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.