TSK

TSK · रोम 1:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले.

तुम्ही भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हास एकसारखे नागवतील, दुखावतील आणि तुम्हास कोणी त्राता राहणार नाही.

जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.

जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत. त्यांचे साक्षी पाहू शकत नाही किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील.

परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?

ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.

मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो.

ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.

‹आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;›

कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे.

त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’

¶ म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.

कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.

तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.