TSK

TSK · 1 पेत्र 5:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.

जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.

तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.

मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.

¶ ‹म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही?›

परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”

¶ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, ‹“म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका.›

‹कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे.›

कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;