TSK

TSK · 2 शमु 4:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.

योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.

¶ दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”

तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.

सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्यास सांगतो.

या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले.

माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.

‹आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का?›

हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास न्याय दिला आहे.