देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
TSK
TSK · योहा 7:35
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.
त्या दिवशी असे होईल की, परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील, आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार.
कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.
ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
¶ सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते.
पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ.
तेव्हा त्याने मला सांगितले, ‹“जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”›
त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्रजनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
¶ येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,