TSK

TSK · मत्त. 9:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, ‹“तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”›

येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.

मग येशू त्यास म्हणाला, ‹“जा! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”› लगेचच तो पाहू लागला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

तेव्हा त्याने तिला म्हटले, ‹“मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”›

येशू त्यास म्हणाला, ‹“तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.”›

पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.

कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.