परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल.
TSK
TSK · गण 4:15
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे.
पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
¶ परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
¶ लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
¶ मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.
ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.
सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा कराराचा कोश खाली ठेवला. यरूशलेमेमधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून अर्पणे अर्पित होता.
¶ किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.