TSK

TSK · नीति 19:27

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.

परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल.

मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”›

¶ तो त्यास म्हणाला, ‹“तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल.›

‹ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”›

ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये;

¶ जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही

¶ प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.

¶ ‹तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.›