TSK

TSK · 1 पेत्र 2:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.

जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.

न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?

‹तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.›

‹शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल›‹म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.›

¶ ‹जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.›

परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की,

ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.

वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.

आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’

¶ आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.

आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.

तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,

ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.

बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.

कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.

¶ आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”

¶ तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.

आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी.

ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.