तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता.
TSK
TSK · 2 इति 23:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. “त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले.” पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
¶ दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
¶ कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
¶ हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.
अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही.