TSK

TSK · प्रेषि 2:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.

¶ बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.

जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”

लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.”

फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे.”

त्यावर येशू त्यास म्हणाला, ‹“तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”›

‹परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.›

‹नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”›

हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते.”

येशूने तिला म्हटले, ‹“तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”›

त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.

‹जी कामे दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.›

हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?

मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही या मनुष्यांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.

¶ सगळ्या यहूदीया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याची सुरुवात योहानाने लोकांस बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला, त्याने झाली.

ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले.

मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ‹“ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”›

नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.

चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.