TSK

TSK · दानि 10:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.

त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.

मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले.

तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.

त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला.

आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.

पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग.