त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत.
TSK
TSK · उत्प 41:30
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते.
त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.
¶ गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल. जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील. कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.
एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.