हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
TSK
TSK · ईयो 7:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार.
जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो.
तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.
परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
ज्या ठिकाणापासून ती आली, माती परत मातीला मिळेल, आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.
परमेश्वरा, आमच्यावर सतत रागावू नकोस आणि आमची पातके कायमची लक्षात ठेवू नकोस. जे आम्ही तुझे लोक आहोत, कृपया आम्हा सर्वांकडे लक्ष दे.
परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.
कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
¶ दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.