TSK

TSK · योहा 10:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.

हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन. खरोखर मी इस्राएलाच्या उरलेल्यांना एकत्र करीन. कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे, तसे त्यांना मी एकत्र ठेवीन. मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा गोंगाट करतील.

ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.

‹या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.›

‹कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.›

म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, ‹“मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”›

¶ तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,

तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे.

कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.

आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा.