TSK

TSK · लेवी 26:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.

तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.

मग नफताली, व आशेर, व मनश्शे यांतली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.

मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.

¶ त्यावेळी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही.