नहे 3:15
TSK
¶ मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.