TSK

TSK · गण 14:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील.

त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.

तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.

म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.

ज्या प्रमाणे मिसराच्या रानात तुमच्या वाडवडीलांचा न्याय केला, तसा मी तुमच्या बरोबर करे, हे परमेश्वर देव घोषणा करून सांगत आहे.

तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्यास मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.

ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”