TSK

TSK · गण 21:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”

मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”

फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “या वेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत.

तेव्हा या वेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”

¶ “म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,

मी परमेश्वरास विनवणी केली की हे प्रभू तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करून बाहेर आणले आहेस.

मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.

तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.

¶ ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.

म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.

¶ म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”

तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”

¶ बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.