TSK

TSK · गण 27:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;

तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही.

लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.

¶ यहोशवाच्या मृत्यूनंतर, इस्राएल लोकांनी परमेश्वरास असे म्हणून विचारले, “कनानी लोकांशी लढावयास आम्ही जाऊ तेव्हा आमच्या वतीने पहिल्याने कोणी स्वारी करावी?”

आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.”

असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.”

आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”

मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.

अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते.