TSK

TSK · नीति 15:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?

परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.

जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.

कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.

दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.

तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.

आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.

त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.

कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर असते.”