TSK

TSK · स्तोत्र 13:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.

म्हणून राजाने मला विचारले, “तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस. तू तर मनातून दु:खी दिसतोस.” मग मी फार घाबरलो.

तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे?

मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.

पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.

नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.

तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.

पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.

सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.

मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?

हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?

माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.

जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.

हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.

शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.

तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.

माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?

तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.

परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.

येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, ‹“माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”›

‹पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.›

तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.