¶ ‹‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.›
TSK
TSK · 1 योहा 4:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
येशूने उत्तर दिले, ‹“पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे.›
‹मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.›
¶ प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा.
ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
¶ बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;
आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.
आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.
¶ तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.