TSK

TSK · प्रेषि 2:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसर देशामध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता.

¶ त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात व मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील.

घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.

त्यास मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुबी आणि कुशी त्याची चाकरी करतील.

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील.

तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.

¶ वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.

तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.

¶ अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल.

सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली.

परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही.

करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.

¶ त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, ‹“धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”›

तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला.

म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.

तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.