मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
TSK
TSK · आमो 1:2
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल? त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”
“तर यिर्मया, तू त्यांना हे भविष्यवचन सांग, त्यांना बोल: परमेश्वर उंचावरुन गर्जना करतो, आणि त्याच्या पवित्र मंदिरातून आपला शब्द उच्चारील, तो त्याच्या कळपाविरूद्ध गर्जना करील. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, तसा, देशाच्या सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तो ओरडेन.
जिची पिल्ले चोरी झाली, अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन, जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो.
आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.
सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?
ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.