TSK

TSK · आमो 8:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”

राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.

येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”

त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.

पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.

त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.

जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.

“परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया, तू त्यांना असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो: प्या आणि त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा, पडा आणि मी पाठवत असलेली तलवार येण्यापर्यंत परत उठू नका.

हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.

शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.

शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.

इस्राएलाची कुमारिका पडली आहे; ती पुन्हा कधीही उठणार नाही; तिला एकटीलाच सोडून दिले आहे, तिला उठवणारा कोणीही नाही.

ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? ती यरूशलेमच आहेत की नाही?

शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.

परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.

तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.