TSK

TSK · यश 13:22

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.

तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.

मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.

रहीवाशी असलेल्या लोकांच्या भूमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे, आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकू येणार नाही.

तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.

कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.