पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
TSK
TSK · लेवी 27:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
लेवी 25:28
TSK
लेवी 27:28
TSK
¶ लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
अनु 13:17
TSK
ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्यास तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल.
एज्रा 10:8
TSK
आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडीलांच्या मसलतीप्रमाणे तीन दिवसाच्या आत यरूशलेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकांस हद्दपार करावे.