TSK

TSK · गण 1:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”

राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”

¶ त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.

¶ त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”

¶ यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.

¶ पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

¶ पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

¶ देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः

¶ ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.