TSK

TSK · दानि 5:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरूशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरूशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”

दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.

तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस. तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस. तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील.

तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा.

¶ आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल, आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील.

¶ मग हा दानीएल दारयावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच्या कार्यकाळात समृध्द झाला.

¶ जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत.