TSK

TSK · ईयो 10:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही.

तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो.

ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही.

जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”

मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.

तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.

परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.

जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो, पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो, कारण ते पुष्कळ होतील. जे सर्व येते ते व्यर्थच आहे.

कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?”