दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.
TSK
TSK · दानि 7:15
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.
¶ राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.”
¶ मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो.
¶ या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.
मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.
की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”