TSK

TSK · रोम 3:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.

तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.

कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.

तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.

पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.

‹तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.”› त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”

कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील?

कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार?

¶ मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.

¶ मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.

¶ मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे.

पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.

मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले,

जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.

¶ ‹फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः› ‹जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.›