माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे, माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.”
TSK
TSK · याको 4:9
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?
त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील. कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.”
‹‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, › ‹कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’›
¶ ‹जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.›
कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते.
तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.